Sunday, March 29, 2015

एका वल्ड कप ची दुसरी गोष्ट


World Cup finals in Melbourne, and  unusual cold weather in Melbourne reminding my friend  Shruti Nargundkar of  childhood winter mornings, and the  happenings in Dhanurmaas.  

Dhanurmas, the wanderings of the Sun northwards to Tropic on Cancer and then in reverse;  the wanderings of kids, for dawn baths in the river, visits to temples, and back to a robust winter breakfast cooked by Mom/Aai, Bajri Bhakris hot off the griddle, lumps of butter, traditional bhajis and chutneys ; that's just to mention a few.  For getting a full meal, read her post here.    

And yet, there is something similar happening now in Melbourne,  where it looks like a celebration of a late Dhanurmas, in a land where the seasons are opposite of ours, but the thinking clearly remains the same.

Cricket or food.

कर्कवृत्तात्ली थंड पहाट ,
नदीकाठी पाण्यातले सांघिक स्नान ,
आणि उडी मारून
मंदिराबाहेरची मोठी घण्टा वाजवताना
कौतुकाने खुलवणारी
वार्याची झुळूक;
सर्व देवांचे आशीर्वाद,
आणि मग
एका उबदार स्वयंपाकघरात
गोल बसून अनेक चटण्या भाज्यांनी
चटपटीतपणे बघित्लेले
तिळानी नटलेल्या बाजरी बाईंचे
आणि त्यांना बघूंन पिघळ्णार्या
लोणीरावांचे पहाट नाट्य ;
पोक्त्पणे समजूतदार खिचडीच आगमन
आणि मग कधीतरी
गळ्याखाली उड्या मारत धावलेले ताक .

आज मकरवृत्तातहि अनपेक्षित
थंड बर्फाळलेली पहाट,
अनेक संघांनी सकाळी सकाळी
केलेले घामाने ओथंब्लेले
अथक सांघिक सराव,
देशाच्या अनेक कोपर्यात केलेल्या
क्रिकेट देवाच्या आरत्या ,
डक्वर्थ्लुवीस वाल्यांशी दिलेली झुंज ,
अनेक देशांनी वाजवलेल्या विजयाच्या घण्टा ;
आणि मग
मेल्बोर्नी स्वघरी
उबदार गर्दीत एका धुन्धुर्मासाच्या
आठवणींची पंगत .

डीप फाईन लेगला
कोणा एका भाकरीला पकडण्यासाठी
आसुसलेले भरीत ,
स्क्वेर्लेग्ला अनेक भाज्यांना सांभाळत
त्यांच्यात गुंगून गेलेली लेकुरवाळी भाजी,
"इश्श, काय हे…!" म्हणत
लोणच्याच्या खारापासून तोंड फिरवणारी
जवसाची चटणी ,
"तरी मी सांगत होतो…" असं
पुन्हा पुन्हा सांगणारे दाणोजी राव ,
टाळ्यांच्या गजरात
झालेले औस्ट्रेलिअन बाजरी फलंदाजांचे
तिळाचे हेल्मेट घालून आगमन,
आणि
मनातल्या मनात हसत ,
भाकरीशी अंतापर्यंत झुंज देण्याची प्रतिज्ञा
करून आलेले
न्यूझीलंडचे लोणी गोलंदाज.

विजय कोणाचाही होऊ दे
महत्वाचे हे
कि
एक एक फलंदाज गेल्यावर
श्रुतीच्या स्टेडियम ताटात ,
"घे ग, अजून एक गरम भाकरी वाढते "
आणि त्याच बरोबर,
हळूच न्युझीलंड लोण्याचा गोळा
आणि चट्ण्यानची फिल्डिंग
लावणार्या विश्व चषक विजेत्या आजी
तिथे असणे . ….

1 comment: