Thursday, October 8, 2015

A Bhajani Remembers भाजणीच्या आठवणी.....

गेली कितीतरी शतके ,  थालीपीठाची भाजणी दळणे , हा  महाराष्ट्रातील पारंपारिक उद्योग आहे, आणि घरा घरात , अनेक सुंदर ओव्या गात , खमंग भाजण्या तयार होते असतात .

परदेशात गेलेल्या एखादीस  अचानक थालीपीठ खावेसे वाटले , तर काय होते असेल ?

माझी मैत्रीण धनश्री बोपर्डीकर हिने ह्यावर एक हायटेक तोडगा काढला .  तिच्या किचन-एड  उभ्या मिक्सर ला तिने  धान्य दळायची अटाचमेण्ट आणून लावली,  धान्ये भाजली , आणि भाजणी तयार झाली !

मला आपला उगीच वाटल , खुद्द भजणी ल ह्या बद्दल काय वाटलं  असेल.

म्हणून एक कविता   


For centuries and more, bhajani , or a roasted grain mixture native to Maharashtrian Traditional Cuisine, has been always stone ground at home,  many times as a cooperative venture amidst much singing of songs of rural women's relevance,  handed down over generations.

When you live far away from the motherland, and get an irresistible urge to eat thalipeeth, (which is the reason bhaajani is made ) , what do you do ?

My friend Dhanashree Bopardikar who lives in the US,  simply went and got a Grain Mill Attachment for her Kitchen Aid stand mixer, roasted the grains, and ground her bhajani , in , as they say,  in a jiffy.

(Bhajani is a roasted ground mixture of jowar, bajra, wheat, mung, chana , pohe, , dhaniya and jeera ;  there are slight regional variations also.)

Very clearly, it seemed to have been a new experience for the veteran Bhajani itself.




नव्या जगात, थोड्या बावरून गेलेल्या
जोंधळे आजी ,
लगबगीने बाजरी मावशींच्या

शेजारी जातात,
आणि गहू-चणे-मुगाङ्कडे एक दृष्टीक्षेप टाकून
हुश्श करत स्वतःला थंड करत
म्हणतात ,
" आयुष्यात काय काय बघितलं हो !
खास आमच्यासाठी रचलेली गाणी
आणि
आई मावशीनकडे बघत,
त्या गाण्यांचा आस्वाद घेत
धने जीर्यांबरोबर , पोह्यांना धरून
दोन प्रारभ्दाच्या दगडांमध्ये ,
हळू हळू आयुष्यात भरडले जाणे ,
आणि पुन्हा पीठ रुपी
पुनर्जन्म अनुभवणे . "

मग हळूच येणारे लाकडी उलथने
चुकवून ,
जोंधळे आजी , बाजरी मावशीना घेउन
चुपचाप बाकी सगळ्यान बरोबर
एका चकाकणार्या भांड्यात पडतात ,
एक भाजका श्वास घेतात
आणि म्हणतात ,
" हल्लीचं आयुष धकाधकीच,
प्रत्येक गोष्टी साठी बटण ;
आणि दळ्तात इतक्या वेगात
कि आई मावशी तर दिसत नाहीतच ,
पण त्यांची गाणीही ऐकू येत नाहीत .
इतका मोठ आवाज ,
मला वाटत त्याला
"रॉक " का काहीतरी म्हणतात,
खूप वेगात संगीत,
त्यावर नाचून नाचून अगदी गरम वाटत;

पण शेवटी काय ,
भाजावे आणि पीठ रुपी उरावे …
पूर्वी गोल दगड होते आणि दांडक ,
आता संगीत "रॉक"…

इतक्या दूरदेशी आल्यावर
फिरणे चुकत नाही
आणि
इंग्रजी मध्ये का होईना ,
 
दगडाशी नात कस टिकून राहत न ?

No comments:

Post a Comment