Wednesday, February 24, 2016

एका दुधाची गोष्ट.....


आज माझी फेसबुकची मैत्रीण निहारिका भिडे  , हिने  ताज्या लोण्याच्या आठवणी अचानक जाग्या केल्या.  लहानपणी बघितलेल्या आणि काही घरांमध्ये अजूनही राज्य करणाऱ्या  रव्या ,  आणि दही घुसळून बनणारे  अदमोरे ताक ,  अचानक तरंगणारे ताजे लोणी ,  त्या लोण्याचे सन्सनाटी  आयुष्य ,
आणि मग अग्निपरीक्शेने प्रगट होणारे   तूप . 

एकिकडे तूप साखर लोणी आणि पोळी /ब्रेड ,  भाकऱ्या /लोणी , चकल्या/लोणी , आणि मग अचानक त्याच्या दुग्ध भूतकाळ  सामोरा येतो … 



एक विचारवंत दही ,
मन घट्ट करून
आपल्या कौटुंबिक इतिहासाचे मनन
करण्यात मग्न.

एका वासराच्या हिश्यात्ला भाग ,
चुलीवर ढवळून निघालेल्या उकळ्या ,
कधी स्वस्थ कोमट आराम ,
मग काही स्वप्नांना लागलेले विरजण ,

कर्मभोग कधी सुटत नाहीत ,
आणि मग एका रवी ने केलेलं मंथन ,
मधूनच हळुवार ताकात फिरणे ,
कधीतरी बर्फाचे पाणी थोडे घालणे ,
मग खेळकर बाळ लोण्याना एकत्रित करणे,
झेलणे ,
आणि समजावून ,
अलगद पाण्याच्या वाडग्यात ठेवणे .

एकिकडे ताक
आपले प्रारब्ध लक्षात घेउन,
कधी गोड,
कधी आले-मिरची युक्त ,
आणि कधी हिंगाष्टक घालून
अत्म्समर्पणास तयार .


काही लोण्याची जन्मवेळ शुभ ,
आणि ते
कौतुकाने साखरेबरोबर ,
मधाबरोबर,
अगदी भाकरी आणि चकली बरोबर सुधा
उर्वरीत आयुश्य बेततात

पूर्व कर्माची फळे
आयुष्भर भोगावीच लागतात .
वयात आलेल्या लोण्याची
मग कढई परीक्षा ;
एका काळ्या लोखंडी रागावलेल्या कढईत
असहाय्यपणे पडणे ,
कुणा एका हळदीच्या पानाने
"आगोबाई, जरा उशीरच झाला हो …"
म्हणत समजवायला येणे ,
आणि मग हळु हळू
सर्व स्वप्नांचा एक बेरी चुराडा होऊन
एका सुबक सोनेरी साजूक तुपाच्या
तळाशी गोळा होणे .

ओट्यावर मनन करण्यार्या दह्याला कळून चुकतं ,
की वासराच्या हिश्याचे घेतल्याने ,
धडा म्हणून,
व आपल्याला दुसर्याचे मन कळावे ,
म्हणून
दुधाला इतक्या क्रीयाकार्मातून जावे लाग्ते.

आपल्या नशिबात असते
ते कधी चुकत नाही ,
आणि आपण इतके विद्वान
की आपण त्यातून काही शिकत नाही . 
 
  

No comments:

Post a Comment