Saturday, July 23, 2016

A Masala Unity मसाला एकीकरण समिती

Ever prepared three different stuffed veggies in a single unified dish ?  NO ?  My friend Shruti Nargundkar of Melbourne, actually did this, put a picture, gave clues via a Marathi short poem, and challenged  folks to guess what veggies had participated. 

The clue : 

दोन गावरान गब्रू , एक पाहुणा भाऊ
मसाला भरून तेलात शिजले बरे मऊ
एक गोड कोवळा तर दुसरा जहर कडू
पाहूणा आंबट हिरवा, कच्चाच खेळाडू
पोखरून मसाले भरून फोडणीत पडले
भेदभाव संपवून ग्रेव्हीशी समरस झाले
चमचमीत भाजी झाली भारी चटकन
शिलेदार अनोखे ओळखा पाहू पटकन!

While scores of ladies went ballistic guessing the stuff over a couple of hours, turns out that the answer was, green tomato,  bitter gourd(karela) , and snake gourd (padwal). 

Naturally, one looked for a lesson in all this . Then i found it, first in Marathi, and then in English.



काही भरदार , गोल, आणि लठ्ठ,
काही कमनीय पण काटेदार ,
काही लांबसडक , लवचिक आणि फिके.

एकमेकाला ओझरते दृष्टीक्षेप फेकत
राजकारण्यांसारखे खलबते करत
एकमेकांशी न बोलत
फ्रीजच्या एका खणात.

मग सौ नरगुंदकर सभापत्नींचे आगमन ,
गलेलठ्ठ गोल कच्च्या टोमॅटोची
बारियाट्रिक गरी शस्त्रक्रिया ,
कमनीय काटेदार कारल्याच्या बियांना सोडवणे ,
आणि लांबसडक पडवळाची ,
आई ग ऊई ग ला न जुमानून
केलेली अंतर्गत सफाई.

सर्वांच्या आपापसात फाटाफुटीचे कारण
समजून घेऊन,
सभापत्नीबाईंनी ,
गर ,बिया, आणि पडवळीय वस्तू
एकत्रित केल्या ,
त्याना बेसन, कांदा, दाणेकूट,
व तिळकूटाचे धडे देऊन,
वर आले, लसूण, मिरची, धने जिरे,
हळद , मिठाचे मार्क देऊन
व्यवस्थित समज दिली ,
आणि मग थोडी दया येऊन
गूळ आणि ओला खोबर्याची ट्रीट .

एकामेकाशी न बोलणारे,
कौतुकाने मसाल्याला तपासून,
स्वतःसाठी भरपूर, काबीज करून
गच्चं भरून बसले.
देशाच्या लंगडीत एकत्र शिजले ,
आणि गुण्या गोविंद्याने वागत
प्लेटीत पोचले.

भारतरत्न जोडी
भाकरीराव आणि पिठलीणबाई
वाट बघून बघून थकलेले ...
पण त्यांना माहीत होतं ,
राजकारणी लोकांना मसाला जनतेला
सोडून काही करता येत नाही.

काय माहीत,
पुढच्या वेळी वांगं निवडून यायचं ....
 Some rotund, hefty and fat,
some shapely, but a bit thorny
and
some long, dull and spineless.

Disinterested glances,
they sat like politicians,
scheming
yet ,ignoring each other
in a refrigerator shelf.

Enter Mrs Nargundkar, the Speaker Ma'am.

Then a bariatric surgery
of the innards
of the green tomato;
a daring rescue
of the seeds of the bitter gourd;
and,
ignoring the pleas,
a scraping and clearing
the plaque
inside the snake gourd.

She puts them all together,
the rescued stuff,
and decides to teach a lesson
with besan, onions,
roasted groundnut and sesame powders,
with some
ginger, garlic, chilly, turmeric,
coriander, cumin
and salt footnotes.
The in a generous mood,
a treat of fresh coconut and jaggery.

The three,
the tomato and gourd cousins,
enamoured of the stuff,
like typical politicians,
rushed to appropriate it
and stuffed themselves
to the gills,
cooking together happily
in the country pan,
arriving in unity
on to the plate .

Our Bharat Ratna pair
of Bhakri Rao and Pithlin Bai
had been waiting
with great anticipation,
and understanding.

They knew,
you can't separate
the politicians from the voters.

Who knows ?
Next time a brinjal may get elected ....

अगोबाई ! दारू ?

 
माझा फेसबुकी मित्र हृषिकेश परांजपे ह्यानी अचानक "अंगत पंगत" ह्या महाराष्ट्रीय / मराठी पारंपरिक स्वयंपाकाच्या ग्रुप मध्ये कोकम रसाचे, लिची रस , लिंबूरस , आणि व्होडका घातलेले एका  कॉकटेलचे फोटो-चित्र टाकले.  मग त्यात अख्खी हिरवी मिरची चिरून घाला असं कोणीतरी सुचवलं .

माझं वय हृषीकेश च्या दुप्पट . लहानपणी  कोणी दारू पितात असा समजलं , की ते  थेट झिंगून पडलेले डोळ्यासमोर दिसायचे. आता त्याचं  हसू येतं . 

घरात नेहमी कुठलेही कोले अथवा दारूचे प्रकार न ठेवणारी  मी , जराशी थबकले .

आणि मग त्यातला विनोद दिसला.   

कोकणातले एक जुनं रातांब्याचं झाड ,
कष्टाने आपली मलूल पाने
लपवत ,

स्वयंपाकघरातील गप्पा ऐकत होतं

गोदाताई जरा दचकल्याच,
आणि गौरीताईं कडे एक
घारा कटाक्ष टाकून
म्हणाल्या ,
"तरी मी अण्णाला सांगत होते ,
बेबीला मुंबईला शिकायला पाठवू नकोस ...
माझ्या मेलीचं ऐकताय कोण? "

गौरीताई चपापल्या ,
कोकम सरबताचा घोट घेऊन
डोक्यात अनेक विचार आले ,
आणि घश्याखाली गेले.

बेबी, एक हुशार मुलगी,
शिकायला आणि नोकरी निमित्त
मुंबईला ,
आणि मग शुभमंगल सावधान !

गोदाताईनी भाजीवर झाकण ठेवलं
आणि रातांब्याच्या झाडाच्या वतीने
कळकळीने उदगारल्या ,
" अगं , कोकम सरबतात लिंबू
हा तर आमचा शोध ,
आणि आता हे कोणाची कोण लिची
पिळून घालतात ,
पेल्यावर कोथिंबीर लटकवतात ,
बर्फ टाकतात ,
आणि मग चक्क दारू घालतात ? "

गौरीताईंच्या हातातून
कोकमचा पेला खळ्ळकन पडला .

रातांब्याच्या झाडाला पाणी शिंपडत ,
शुद्ध करत,
दोघी फिरल्या,
आणि गौरीताई जाता जाता म्हणाल्या ,
"बेबीला म्हणावं ,
शुभमंगल झाल, पण आता सावधान रहा ग !
कोणीतरी सांगत होतं ,
परांजप्यान्चा हृषिकेश ह्यात हिरवी मिरची उभी चिरून घालतो ? ... "

Friday, July 22, 2016

Bhakri Ballads for a Rainy Day


My friend Saee Koranne-Khandekar recently posted a photograph of an "infused Jowar Bhakri";  which is like a  jowar bhakri  made from jowar dough  which is spiced up and revelling in its garlic, chilles, fenugreek and ajwain additions. Patted/rolled/cooked and blooming on a blue flame, there is nothing better than this with a dollop of butter and a bowl of dahi, on a Mumbai monsoon morning.

Saee has recently authored and published a book , "Crumbs ! Bread Stories and recipes for the Indian Kitchen", which contains  exhaustive information and recipes , on Indian "breads" , (like bhakris/thalipeeth et al )  besides what  we may call western breads.  All this, complete with memory narratives that take you right into childhoods and the family kitchen. 

As she says in her post "PS: Recipes and tips for the perfect Bhakri and lots of such variations (and a chapter on my grandmother's childhood memories of the Bhakri in my book, Crumbs!"

A bunch of enthused ladies augmented her post with their own ideas of enhancing the original Jowar Bhakri.  I happened to mention recycling a Baingan Bharta within a Bhakri, and then someone mentioned the Ghatotkach Bhakri. 

Just reminded me of something.




चुलीवरचे महातवा युद्ध.
आत्मसंतुष्ट घडीच्या
कौरव पोळ्या , पुर्या ,
आणि टम्म भरलेले भ्रष्ट दुर्योधनी पराठे.

आणि मग एकीकडे,
वेळीच कामाला येणारी
पांडवांची जोंधळी सेना.

स्वच्छ, स्पष्ट , कदाचित भोळ्या,
साध्या युधिष्टीर भाक्र्या ,
रेखीव पर्णयुक्त, कधी कधी तिखट,
नेमक्या चवीच्या अर्जुन भाक्र्या..
शक्तिमान उडीद आणि सत्तू युक्त
बलशाली भीम भाक्र्या..
थोड्या कमी आडदांड,
पण लसूणी शेपू मेथीवाल्या नकुली भाक्र्या,
आणि लक्षपूर्वक
मेथी, लसूण, आणि ठेचलेलं आयुष्य
पारंगत सहदेवी भाकरीसंग
घालवणाऱ्या
मिरच्या आणि ओवे .

मग जोंधळे सेनेच्या
तीळ पेरलेल्या
चक्रव्यूही युवा अभिमन्यू भाक्र्या ,

आणि शेवटी
अनेक फोडणीयुद्धातून "परतून"
वापस आलेल्या भाज्या आणि रायती
आपल्या कधी लहान,
तर कधी विशाल देहात
सामावून घेणाऱ्या घटोत्कच भाक्र्या.

महातव्यावरचे तुंबळ युद्ध ,
आणि
कौरवांचा तेल तूप शिष्ठाचार,
जोंधळे पांडवांच्या अग्नीवर फुलण्याच्या
तपस्ये सामोर कमीच पडला .

हो. जोंधळे पांडव जिंकले

आणि त्यांचे कृष्णसारथी
शेवटी आपले स्वाभाविक वैशिष्ट्य दाखवणारा
लोण्याचा गोळा घेऊन
आले हे सांगायचे राहूनच गेले .
The Stovetop Maha Griddle Wars.

Complacent, multifold
Kaurava Chapaties,
Puris ,
and
Stuffed, Corrupt,
Duryodahni Parathas .

On the other side,
standing up
to be counted,
the Pandav Jowar Sena .

Clean, succint,
straightly innocent
simple Yudhishtir Bhakrees;

Chiselled features,
leaf encrusted,
spicy just so, Arjun Bhakrees;

Powerful,
Udid and Sattu empowered
Super Bheem Bhakris ;

A bit less overbearing,
but garlic-dill-fenugreek
incorporated  Nakul Bhakrees ;

And some thoughtful
coming together
of garlic and fenugreek,
amidst chillies and ajawain
having a big crush
on Sahadev Bhakris.

And what do you say
about sesame-in-a-circle
dotted youthful Abhimanyu Bhakrees;

Last but not least,
encompassing
all the stir-and-cook-weary
vegetables  and salads
amidst his
sometimes small and
sometimes huge
magical body,
Ghatotkach Bhakrees .

Desperate wild battles,
and the
Kaurava protective OilGhee protocol
falls woefully short
of the
Bloom-on-the-Fire Expert
Pandav Protocol.

Yes. The Jowar Bhakri Pandavas won.

What I almost forgot to mention,
is that Krishna,
the Charioteer of Arjun,
was present for the celebration
with his
customary lump of butter.....

Saturday, July 16, 2016

Hot, Green and Rocking !


My friend Vandana Koranne of Toronto,  who runs the Indian Family Garden page on Facebook,  and Instagram , recently posted a photo of a selection of hot peppers and not so hot peppers (capsicum mirchis ) , from her own garden,  and asked folks  to suggest pickle recipes.

While images of stuffed fried hot mirchi bhajjias  , folks eating these raw as a salad etc,  immediately floated by ,  one had to think of the elderly capsicums.  And I listened ....

And guess what, they were speaking in Marathi .  And then by and by , in English. 

(To see some great pictures of her garden produce, check out https://www.facebook.com/Indian-Family-Garden-543853252440986/photos )

         (photo by Vandana Koranne)
दोन वय न दाखवणार्या
आजी मिरच्या,
आणि आजूबाजूला घोळक्यात
विवध "फेर आणि लव्हली"
आणि "डार्क आणि ब्युटीफुल"
ललना .

आणि मग ..

"आमच्या आयुष्यात केवळ बटाटे
आणि
फार फार तर बेसन आले ;
कधीतरी उरलेला भात ,
आणि आम्ही कायम असेच राहिलो ,
गोल, पण फोफश्या....

मुलींनो ,
आपापसातले फरक विसरा ,
आणि स्वतःचे बारीक तुकडे करून ,
मेथीच्या पुडीचे आणि मिठाचे फेशल करा.
मोहरीची डाळ येताच , लिंबाच्या रसात
तिचे स्वागत करा ,
आणि फिरवून फिरवून
तिला अगदी चढवून ठेवा ,
आणि त्यात स्वतःला झोकून द्या .
मग लेटेस्ट फॅशन म्हणून
गरम तेलाच्या हिंग-मोहरी फोडणीचा
स्प्रे स्वतःवर मारा
आणि
मग दही भात चाहत्यांची रांग बघून
धन्य व्हा..."

असे म्हणत ,
ढब्बू मिरच्या उर्वरित आयुष्य
पिझ्झारावांबरोबर घालवायला रवाना झाल्या .

Two amazingly young looking
grandma capsicum peppers,
and a bevy
of slender,
with it,
fair and lovely
and dark and beautiful
hot chilly peppers.

The older lament.

"A life of potatoes,
besan and leftover rice,
we remain unchanged,
rotund and hollow.

But girls,
forget your differences ,
and come together,
as you enjoy
salt and fenugreek facials,
and welcome
cracked mustard yellow chaps
by immersing them in lemon juice
and getting them high.

Join them
as you spray yourself
with the latest
mustard asafoetida perfume
and then
watch the
Dahi Bhat admirers line up !"

Having said this,
the portly capsicums depart.

To spend their remaining life
with Senor Pizza .....

Saturday, July 9, 2016

एक तत्वज्ञानी लाटणे ....

 
माझी मैत्रीण सौ. श्रुती नरगुंदकर , मेलबोर्नला राहते. शैक्षणिक क्षेत्रात , योजना व आराखडे आखून, एखादा विषय उत्तम रीतीने कसा शिकवला जावा , यासाठी  आज्ञावल्या व सूचना बनवणे , या क्षेत्रात तिचे नाव .

ह्या व्यवसायात ती जेवहा गुंग नसते तेव्हा ती   अतिशय सुग्रण, पारंपरिक पदार्थ , व इतर देशांचे पदार्थ करून बघण्यात व त्यांच्याबद्दल लिहिण्यात  व्यस्त असते .  तिचा "Shruti's Blog" ह्या ब्लॉग साइटवर ,  ह्या पदार्थांच्या बनवण्याला ती स्वतःच्या लहानपणीच्या आठवणीची , फोडणी देऊन , अगदी चटकदार लेख लिहिते.
  
सद्ध्या मेलबॉर्न मध्ये थंडीचे दिवस आहेत .  सात अंशात कुडकुडून घरी आल्यावर , वरणफळासारखा दुसरा पोटभरीचा पदार्थ कुठला असणार ?   ह्या विषयावर तिची ब्लॉगपोस्ट वाचली , आणि उगीच मला भगवदगीता आठवली ....




ओट्यावरच्या परातीत
पाण्यात खेळून खेळून दमलेले,
एकत्र येऊन ,
स्वस्थ बसलेले पीठ,
आणि रोजच्या प्रमाणे शिस्तीत
लाटण्याची वाट बघत ,
पिठीकडे डोळे करत,
आपण चांगले, आपले कर्म चांगले ,
असे समजून चुपचाप बसलेली कणीक .

बाहेर कडाक्याची थंडी ,
आणि एका पातेल्यात अचानक
गरम झालेले तेल,
आणि त्यात उडणार्या मोहर्या बघत
"इश्श्य ! काय बाई हा उत्साह " असे म्हणत
वाफेने माखणार्या खिडक्या.

लगबगीने आपल्याच महत्वात गुरफटून
त्यात पडणारे कांदे
कढीपत्ते ,
आणि
"या न डाळकाकू , 

अजिबात थंडी नाही वाजायची"
असा म्हणत स्वतः आत पडणारे
भाजी मंडळाचे आजीव सदस्य;
मग नेहमी प्रमाणे ,
संसदे मध्ये होतो तसा कल्लोळ,
सगळ्यांना उकळी फुटणे,
आणि स्पीकर-डावबाईंने आल्या आल्या
सगळ्यांना व्यवस्थित शिस्त लावणे .

खास चिंच गूळ, खोबरं , मसाला 

यांचे आगमन
आणि
एकीकडे कणकेची लाटी ,
न राहवून पिठीत डुबकी घेऊन येते .
लाटणे आजी बघतात ,
आणि हलक्या हाताने तिला समजावतात ;
"आपण फक्त आपलं काम करत राहायचं;
मोठं व्हायचं ,
आयुष्याचा उत्तम आकार ठेवायचा,
कुठलीही स्वप्न बघत
अथवा बक्षिसाच्या आशेने
कर्म करायचे नाही.
वेळप्रसंगी सुरीशी दोन हात करावे लागले तरी चालेल,
पण जे काही करायचा ते उत्कृष्ट करायचं "


कणकेची पोळी,
आणि पोळीचे तुकडे होतात,
आणि लाटणेआजींची शिकवण आठवून
सर्व उकळणाऱ्या डाळीत पडतात.

अधिवेशनाच्या शेवटी ,
स्पीकरडावबाइंच्या तर्फे
लाटणे आजींचा सत्कार;
आणि मग "नेहमीचे दोन शब्द ":
" पोळपाट आजोबा नेहमी म्हणत ,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
कुठल्याही फळाची अपेक्षा ना ठेवता
आपले काम करत राहावे ,
आणि असे निष्काम कर्म माझ्या पोळ्या करतात !"

म्हणूनच की काय,
ह्या पदार्थाला वरण फळ संबोधून
कुणा एक श्रुतीने त्यांचा सत्कार केला !

Wednesday, July 6, 2016

भात ताईंची गोष्ट.....

 
माझी मैत्रीण शिल्पा करकरे , संगमेश्वर जवळ कोकणात तुरळ येथे राहते.   पारंपरिक कोकणातील स्वयंपाक , राहणी, विरंगुळ्याचे क्षण , वनश्री , फुले ,फळे  व  स्थानिक पद्धतींची शहरी लोकांना ओळख व्हावी हे ध्येय समोर ठेऊन , Rustic Holidays Homestays ह्या नावाच्या कंपनीचे व्यवस्थापन बघते . 
 
कोकणात सध्या पडणारा मुसळधार पाऊस, आणि भाताच्या पेरण्या, लावण्यांचे दिवस . गावातल्या लोकांसह त्या कामात सौ. शिल्पा व तिचे यजमान ही मग्न असतात . 
 
तिने पोस्ट केलेले  काही फोटो ,  मुंबईच्या रस्त्याच्या खड्डयांबद्दल कुरकुर करणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना बरच काही शिकवून जातात. 

 
आणि एकीकडे कुकरमध्ये शिट्ट्या मारत भात शिजत असताना एक कविता सुचते ...
 


ओलसर, ओळींनी रुजलेले बीज ,
वेळोवेळी त्यांवरून ,
पाटा कडून शिकुन आलेले
कौतुकाने वाहिलेले ओघळ,
आणि जन्माला आलेल्या भात-ताई.

निळ्या आकाशाकडे हट्टाने केली मागणी ,
गडगडून धावून आलेले ढग ,
पावसाची संततधार ,
आणि सर्व भात-ताई मान उंचावून
वार्यात डुलत कोणाची तरी वाट बघतात .

एक वादळी पावसाळी सकाळ ,
आणि वयात आलेल्या उत्सुक भात ताई
घोळक्याघोळक्यांनी टोपलीत विराजतात ;
औट घटकेची सुट्टी ,
आणि मग आपल्या उर्वरित
प्रौढ आयुष्याची सुरवात ,
एका नवीन शेतात ,
पावसाच्या संततधारांमध्ये ,
कुणा एका शिल्पाच्या हाती
वसुंधरेच्या कुशीत शिरतात.

मग एक सोनेरी दिवस ,
डोक्यावर तुरा ,
आणि भात ताई आपल्या सासरी जायला निघतात .

त्यांना काय माहीत,
की कापणी, झोडणी , मळणी ,
ह्या सासरच्या पद्धती !

भातताई धीराच्या .
डोळ्यासमोर साजूक तूप ,
मेतकूट , वरण , दही
सर्व दिसलं ना,
की सगळ्या जया रत्ना भाताला बळ येतं

Tuesday, July 5, 2016

The Whistler Decides.....


My friend Nutsure Satwik  must be living in a birders paradise, given the wonderful bird photos that he often posts.  This one, of the Whistling Thrush,  otherwise known to scientific types as as Myophonus Caeruleus.

These birds are known for their human like whistling sounds  at dawn and dusk, and they are found in the Himalayas, the subcontinent,  as well as South East Asia.


While one may gather other details from Wikipedia,  what intrigued me was the expression on the face of the bird.   An expression of wondering about things around it, worry, and a determination to do something , given some new laws passed by our powers-that-be allowing establishments to be open 24 x 7. 


What ?  Read on ...
 
Myophonus Caeruleus,
habituated to whistling
before light at dawn
and
after light at dusk,
much after a
a smashed escargot meal
studded with earthworms.

Times have changed
and it wonders
how it will now sense
dusk and dawn,
now that
everything will work,
bright lights on,
24 x 7,
as per our new laws.

Never mind.

Deep thinking
and shocked observations,
has led to the decision
of becoming
instead,
a full time whistle blower. ?